विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त तपश्री प्रतिष्ठान भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू निदान उपचार शिबिर संपन्न
करमाळा प्रतिनिधी विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी तपश्री प्रतिष्ठान व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने *मोतीबिंदू निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या वेळी करमाळा शहर व तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून उपचारासाठी रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुण्यातील प्रसिद्ध हाॅस्पिटल इनलॅक्स बुधरानी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.. अंध लोकांची काठी होण्यापेक्षा दृष्टी देऊन डोळे होण्याचा प्रयत्न करणार आहे असे मार्गदर्शक दानशूर व्यक्तीमत्व श्रेणिक शेठ खाटेर( संस्थापक तपश्री प्रतिष्ठान करमाळा ) यांनी सांगितले आहे. यावेळी प्रतिष्ठीत व्यापारी नितीन शेठ दोशी, नाभिक संघाचे अध्यक्ष नारायण पवार , साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक दिनेश मडके उद्योजक जमील भाई काझी, सामाजिक कार्यकर्ते गुलाम गौस भाई कुरेशी जमीर सय्यद अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा रमजान बेग सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन आझाद भाई शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा जहाँ गीर बेग उपाध्यक्ष डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन जिशानभाईजी कबीर युवक नेते व सकल करमाळा मुस्लीम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शक श्रेणिक शेठ खाटेर यांचा सकल करमाळा मुस्लीम समाजा तर्फे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याबद्दल जे योगदान दिले आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
