करमाळा

करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून देऊन एक वेळ सेवेची संधी द्या – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचे सरकार असून एक वेळ करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सेवेची संधी द्यावी करमाळा शहराचा नक्कीच आपण सर्वांगीण विकास करू असे मत महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्त सुभाष चौक येथे आयोजित सभेमध्ये व्यक्त केले. या सभेला भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनिता कन्हैयालाल देवी कन्हैयालाल देवी यांच्यासह निवडणुकीत उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक विलासराव घुमरे सर भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल , युवा नेते दिग्विजय बागल भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, प्रा. रामदास झोळ सर सूर्यकांत पाटील भाजपा तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, मंडल तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, मा. व्हाईस चेअरमन रमेश अण्णा कांबळे मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये  यशपाल कांबळे यांनी आपल्या समर्थकासह भाजपच्या उमेदवारांना नगरपालिका निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून करमाळा शहराच्या विकास भाजपच करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .या सभेमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिताताई दोशी, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर, दिग्विजय बागल गणेश भाऊ चिवटे नितीन चोपडे, यशपाल कांबळे,किरण बोकन, सुहास घोलप ,मयूर दोशी, सौरभ शिंगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पुढे बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की करमाळ्याला येताना खड्ड्यात रस्त्याचा रस्त्यात खड्डे हे मला शहरात आल्यावर समजले इतकी दुरावास्था असतानाही आपण जनता म्हणून एवढे सोशिक आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि तीच माणसे तुम्हाला अभिमानाने मत मागण्यासाठी येतात हेच खऱ्या अर्थाने करमाळा शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल. करमाळा नगरपालिका निवडणुकीला नगराध्यक्ष पदासाठी सौ सुनिता कन्हैयालाल देवी व आमच्या सर्व वीस उमेदवारांना आपण निवडून द्या मग बघा आम्ही करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करून दाखवणार आहोत. काहीजण म्हणतात की राज्यातील तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे मी म्हणतो त्यांच्याकडे चाव्या असतील तर बँक आमचीच आहे. मुख्यमंत्री आमचा असल्याने आर्थिक बाबतीत कुठल्याही प्रकारची कमतरता आम्ही विकासाकरता कमी पडू देणार नाही . करमाळा शहरातील रस्ते पाणी याचबरोबर करमाळा शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे जास्तीत जास्त निधीची मागणी करून करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा व आमच्या पक्षाचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देताना देवा  भाऊंनी कुठलाही भेद केला नाही त्यामुळे जातीपाती नातीगोती यामध्ये ना अडकता. विकासासाठी आम्हाला एक वेळ संधी द्या करमाळा तालुक्यातील विकास झाला नाही तर पुढील वेळी आमची माणसे तुम्हाला मत मागायला येणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला हाती सत्ता द्या करमाळा नगरपालिकेला दत्तक घेऊन विकासाची जबाबदारी मी घेतो भाजपचा झेंडा नगर परिषदेवर फडकावा आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने देवा भाऊ जयाभाऊ सदैव तत्पर राहुन सर्वाधीक निधी देऊन करमाळा शहराचा सर्वांगीण विकासासाठी एक वेळ भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. सुभाष चौकामध्ये पार पडलेले या सभेचे  प्रास्ताविक नितीन चोपडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार शेखर जोगळेकर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!