जनसंपर्क व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी व लक्षणे दिसत असलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी -मुख्याधिकारी वीणा पवार

करमाळा दि.13 (प्रतिनिधी) सध्या शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. बरेच रुग्ण कोरोना चाचणीला घाबरुन चाचणी करायला येत नाहीत. मात्र त्यामुळे वेळीच चाचणी न झाल्याने व आजार बळावल्यानंतर चाचणी करण्यात येते. अशावेळी रुग्णांची प्रकृती गंभीर झालेली असते व उपचार करण्यासाठी शहराबाहेर व मोठया हॉस्पिटलला जाण्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, आपल्याला जर सर्दी, ताप, खोकला अशक्तपणा, घशाला खवखव , श्वनसनास त्रास, धाप लागणे, यापैकी काहीही लक्षण जाणवल्यास आपण लवकरात लवकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथे सकाळी 10 ते 11या वेळेत कोरोना चाचणी करुन घ्यायची आहे. सकाळी 10 ते 11 या कालावधीत रोज कोरोना चाचणी कॅम्प सदर शाळेत सुरु आहे.
त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येकाकडे मोबाईल, टीव्ही, या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक कुटूंबाकडे ऑक्सीमिटर हे उपकरण असणे अत्यंत आवश्यक आहे. 1500 रुपयांपर्यंत स्वस्त असलेने हे उपकरण आहे. याद्वारे आपल्या शरीरातील ऑक्सीजनची टक्केवारी आपण मोजू शकतो जरी ती 95% पेक्षा कमी झाली तर त्वरीत आपण कोरोना चाचणी करुन घेणे गरजेचेच आहे. घरातील वयस्कर व्यक्तींना स्वतंत्र खोली व सर्वांपासून अलिप्त्त ठेवणे. तसेच मधूमेह, हदयरोग, किडणीविकार, दमा इ. विविध रोग असणाऱ्यांनी स्वतंत्र खोलीत व इतरांपासून अलिप्त राहणे आवश्यक आहे.
आपल्या जीवापेक्षा जीवनापेक्षा काहीही अनमोल नाही. कोरेाना हा आजार अस्तित्वात असे पर्यंत काही नियम व बंधने पाळणे व सकारात्मकपणे व न घाबरता, आनंदाने या सर्वांना सामोरे जाणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क वापरा, इतरांपासून 6 फूट अंतरावर थांबा, गर्दीच्या ठिकाणी जावू नका, होम डिलीव्हरीद्वारे वस्तू मागवा, वारंवार आपले हात धुवा, कुणाच्याही घरी व कार्यक्रम जाणे टाळावे. जास्तीत जास्त काळजी घ्या.
तसेच कोणत्याही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आपण आला असाल तर स्वत:हून कोरोना चाचणी करुन घ्या. त्याचप्रमाणे विविध युवामंडळे, गणेश मंडळे, आस्थापना, व्यापारी असो. सर्व शाळा, कॉलेज आस्थापना, विविध राजकीय संघटना यांनी आपल्या मंडळातील सदस्यांच्या कोरोना चाचणी करीता स्वत:हून पुढाकार घ्यावा व चाचण्या करुन घ्याव्यात.
ज्या व्यक्तींच्या घरी पेशेंटसाठी स्वतंत्र संडास, बाथरुमची सोय आहे व त्यांना लक्षणे नाहीत / कमी लक्षणे आहेत त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची पध्दत सुरु केली आहे. तरी जास्तीत जास्त जनसंपर्कात असणाऱ्या व्यक्तींनी स्वत:हून कोरोना चाचणी करण्याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, करमाळा येथे स.10 ते 11 या वेळेत उपस्थितीत रहायचे आहे हे नम्र आवाहन…- वीणा पवार, मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद.

