Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व तालुक्यात १३ संप्टेंबर रोजी ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह

करमाळा  प्रतिनिधी : 
करमाळा शहर व तालुक्यात १३ सप्टेंबर रोजी एकूण २९० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.  यामध्ये ४४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून  यात २६ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे.आज करमाळा शहरात १०२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १८ जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यामध्ये तर ग्रामीण भागात १८८ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट  मध्ये २६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कानाडगल्ली १ पुरुष ,भीमनगर १ महिला 
खडकपुरा १ पुरुष, २ महिला सावंतगल्ली १ पुरुष 
मेनरोड ३ पुरुष, ४ महिला मंगळवार पेठ १ पुरुष 
कुंकू गल्ली २ महिला दगडी रोड १ महिला 
सुमंतनगर १ पुरुष यांचा समावेश आहे.  ग्रामीण भागातील २६ कोरोना पाॅझिटिव्ह असुन यामध्ये राखवाडी २ पुरुष, २ महिला केम ५ पुरुष, ४ महिला चिखलठाण १ पुरुष, १ महिला, जेऊर ५ पुरुष रावगाव १ पुरुष, १ महिला ,श्रीदेवीचामाळ  १ पुरुष, १ महिला ,कुंभेज १ पुरुष, १ महिला आज ३४ जणांना डिस्चार्ज  दिला असून आजपर्यंत ८०३ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून  घरी सोडले आहे. सध्या ४६१ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा  तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२८६ वर जावून पोहोचली आहे.शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group