करमाळा तालुक्यातील घारगावचे सुपुत्र श्री संजय सरवदे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे वतीने कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहा तर्फे संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोना कोविड-19 महामारीच्या काळामध्ये कोरोना विरोधी लढाईत प्रत्यक्ष भाग घेऊन या महामारी पासून सामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी एका योद्धा प्रमाणे लढा दिला आपले गाव शहर तालुका कोरोना मुक्त ठेवण्यास आपले मोलाचे योगदान लाभत आहे आपल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहतर्फे आपला कोरोणा योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
कोरोना काळात बिकट अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता covid-19 विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केले गोरगरिबांना धान्याचे वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप, व गोरगरिबांना जेवण वाटप, कोरोना विषयी जन जागृती , हॉस्पिटलमध्ये पेशंटला मदत कोरोना काळामध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा बजवल्यामुळे घारगाव येथील श्री संजय सरवदे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला
यावेळी संजय सरवदे यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियासमूह तर्फे डॉ. उज्वला ताई हाके प्रदेश अध्यक्ष भटक्या विमुक्त भाजपा आघाडी अँड. महेश दादा देवकते सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस विश्वजीत दादा खेमनर युवा उद्योजक कुडलिक कायगुडे साहेब सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अभिमन्यू उघडे साहेब अनिल आप्पा धायगुडे महादेव वाघमोडे मुकुंद कुचेकर साहेब राहुल कुदनर मुख्य संपादक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज अशोक नरूटे पुणे जिल्हा प्रतिनिधी यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
संजय सरवदे यांनी भरभरून कौतुक केले व आभार मानले.
