करमाळा तालुक्यातील या 55 गावची जमीन ओलिताखाली आणण्यासाठी दहीगाव ,म्हैसाळ, टेंभू यासारखी उपसा सिंचन योजना राबविण्याची मागणी.


करमाळा प्रतिनिधी
कुकडी लाभक्षेत्रातील झरे येथील तलाव आहे. गाव तलाव व बागल वस्ती तलाव, पावसाळा सुरू होऊन तीन साडेतीन महिने झाले या तलावांमध्ये सध्या चिमणीला पिण्या पुरते सुद्धा पाणी नाही .पावसाळा संपण्यासाठी आता काही दिवस उरले आहे आणि या वर्षी तलाव भरणे दुरापास्त आहे. अशी माहिती सेवानिवृत्त मुख्याधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कांबळे झरेकर यांनी दिली आहे
कुकडी लाभ क्षेत्रात करमाळा तालुक्यातील अंदाजे 55 गावे व 22 हजार हेक्टर क्षेत्र आहे सुमारे वीस ते बावीस वर्षांपूर्वी मुख्य कालवा व वितरण व्यवस्थेची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घेतली आहे ,पण या 22 वर्षांच्या काळात आम्हाला कधीही पाणी आलेले नाही. झरे, कुंभेज जेऊर जेऊर वाडी पोपळज उंब्रड या गावांना तर नाहीच नाही.पाणी ही नाहीआणि कालव्यात जमिनी गेल्या त्याचा आद्याप मोबदला ही नाही.
.शेतकर्यांनी वारंवार मागणी करूनही जलसंपदा खात्याला त्याचे काही घेणेदेणे नाही असे दिसते या बाबतीत करमाळ्याचे माजी आमदार माननीय नारायण आबा पाटील साहेब यांनी ही खूप प्रयत्न केले,तसेच विद्यमान आमदार माननीय संजय मामा शिंदे साहेब हेही प्रयत्न करीत आहेत परंतु अद्याप जलसंपदा खात्याकडून प्रतिसाद मिळत नाही. आमच्या शेतकऱ्यांची किमान अपेक्षा एवढी असते की निदान पावसाळ्यात तरी जेव्हा धरणातून जादाचे पाणी गेट उघडून नदीत सोडतात त्याच वेळी कालव्यातून आमच्याकडे तलाव बंधारे नाले यातून पाणी सोडावे, तेही होताना दिसत नाही. तेव्हा आम्हा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो करमाळ्याच्या पूर्व भागासाठी दहीगाव उपसा सिंचन योजना राबवून दहा हजार हेक्टर क्षेत्राचा प्रश्न मिटविला. दुसरी गोष्ट म्हणजे आता धोमचे पाणी नीरा पत्रात, नीरा पात्रातून उजणीत, आणि उजणीतून मराठवाड्यासाठी पाणी देण्याची योजना चालू आहे असे समजते सीना माढा प्रकल्पातून पुष्कळ क्षेत्र सिंचित केले आहे थोडक्यात सांगायचे जे सहज शक्य नाही ते शक्य करून दाखवले करमाळ्यातील 55 गावचे क्षेत्र हे तर कूकडी लाभक्षेत्रातील मूळ प्रकल्पीय मंजुरीतील आहे.या55 गावाची गावासाठी कुकडीचे पाणी मिळेना आणि कुकडी लाभक्षेत्रात आहे आहेत म्हणून दहीेगाव म्हैसाळ टेंभू सारखी उपसा सिंचन योजना शासन करेना. या 55 गावाची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे .करमाळ्याच्या उशा पायथ्याला उजनी व कोळगाव सारखे मोठे जलसाठे आहेत पण त्या 55 गावाची अवस्था वापा भिजला तरी वरंबा कोरडा राहतो तशी आहे. गेल्या 22 वर्षांत पाणी सिंचनासाठी मिळू शकले नाही दोन वेळा जनावरांच्या पिण्यासाठी थोडे थोडे पाणी आणले त्यावेळी किती द्रविडी प्राणायाम करावे लागले हे शेतकऱ्यांनी चांगले अनुभवले आहे. आवर्तन (रोटेशन) हा प्रकार या भागात अद्याप राबवला गेला नाही.
करमाळा तालुक्यातील या 55 गावचे 22 हजार हेक्टर क्षेत्रासाठी किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी दहीगाव ,म्हैसाळ, टेंभू यासारखी उपसा सिंचन योजना राबवली तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी होईल. त्यासाठी कुकडी प्रकल्पाचे करमाळा तालुक्यासाठी जे आरक्षित पाणी आहे आरक्षित पाणी आहे ते गरजेनुसार उजनीत सोडून मांजरगाव अथवा सोगाव येथून उचलणे योग्य राहील व ते आधीच तयार असले असणाऱ्या वितरण व्यवस्थेतून सिंचन करता येईल.असेही सेवानिवृत्त मुख्याधिकारी कांबळे झरेकर यांनी सांगितले
