Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

सीना नदीवरील बंधारे न अडवता दुरुस्ती केल्यास आंदोलन करणार -संजय घोलप

करमाळा –सध्या सीना नदीत पा त्रातून दुथडी पाणी वहात आहे. तालुक्यातील जवळपास सर्व छोटे मोठे तलाव भरून व्हतं आहेत. याच सीना नदीवर सांगोबा, पोटेगाव हे दोन बंधारे आहेत. ते नादुरुस्त असून बऱ्याच दिवसापासून जनतेची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने त्यास मंजुरी दिली आहे असे समजते. सध्या परिस्थिती पहाता याच महिन्यात 15 ऑक्टोबर च्या दरम्यान बांधाऱ्याची दारे टाकणे गरजेचे आहे. दुरुस्ती च्या नावाखाली ठेकेदार पाणी न अडवता हे काम करणार असल्याचे खात्रीलायक समजते आहे. तसे केल्यास मनसे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे मनसे चे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप यांनी कळवले आहे.
दुरुस्तीचे काम करावयाचे झाल्यास मार्च महिन्यानंतर करा पण सध्या पाणी आडवा अशी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर उपाध्यक्ष सचिन कणसे, किरण कांबळे, आबासाहेब जगताप (वाहतुक सेना तालुकाध्यक्ष) सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख महेश डोके योगेश काळे, म.न.वि.से शहउपाध्यक्ष अमोल जांभळे, मनसे सोशलमेडीया स्वप्निल कवडे, शहउपाध्यक्ष म.न.वि.से सुशिल नरूटे.यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group