आध्यात्मिककरमाळा

करमाळा शहरात टाळ-मृदंग, विठ्ठल नामाच्या गजरात पारंपारीक पेहरावात अवतरली पंढरी युवा नेते शंभुराजे जगताप यांच्या किंग्ज ग्रुपचा अभिनव उपक्रम

करमाळा प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदरच करमाळा शहरातील शाळकरी मुले, पालक, युवकवर्ग व नागरिकां साठी  ‘सामुहिक दिंडी सोहळ्यातून’ पंढरीच्या विठ्ठल दर्शनाची अनुभूतीच आली.भाजपाचे युवानेते शंभूराजे जगताप यांच्या संकल्पनेतून व पूढाकारातून व किंग्ज फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव, दहिहंडी तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे विविध सण-उत्सव व सामाजिक उपक्रमांची शहर व तालुका वासियांसाठी नेहमीच खास पर्वणी असते. कोरोना काळातील त्यांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. आज शनिवारी सकाळ पासुनच शहरात भक्तीमय वातावरण झाले होते. हातात भगव्या पताका, टाळ-मृदंग, तबला, हार्मोनियम, विणा, महाराष्ट्रा सह संपूर्ण भारताच्या संस्कृती चे दर्शन घडवणारी वेशभूषा यामध्ये विशेषतः श्रीराम, लक्ष्मण, विठ्ठल, श्रीकृष्ण या शिवाय आई जिजाऊ, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, राजमाता अहिल्यादेवी तसेच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत बाळुमामा अशा विविध रूपात शहरातील नगर पालिकेच्या सर्व शाळा, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, लीड स्कुलचे शाळकरी मुले-मुले, मुख्याध्यापक-मुख्याध्यापिका , शिक्षक-शिक्षिका, माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते.
याशिवाय शेतकऱ्यांच्या वेषातील वारकरी, खेळाडुंच्या वेशातील, तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या वेशातील वारकरी , पर्यावरण जागृती, कृषी, वैज्ञानिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक व विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन विविध संदेश देत या चिमुकल्या वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचा सामाजिक अन् सांस्कृतिक वारसा या दिंडी मूळे जोपासण्याचे काम या निमीत्ताने झाले आहे.
महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रागंणातून सर्व प्रथम आयोजक युवानेते शंभूराजे जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप साबळे महाराज यांनी दिंडी व अध्यात्माच्या महत्वाचे विवेचन केले त्यानंतर हभप साबळे महाराज, युवानेते शंभूराजे जगताप, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य पोपटराव कापले, सर्व नगरपालिका प्रशालांचे मुख्याध्यापक-मुख्याध्यापिका व इतर मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व अश्व पूजन करून या ‘सामूहिक दिंडी ‘सोहळ्याची सुरुवात झाली व किल्ला-वेस वेताळ पेठ-जय महाराष्ट्र चौक-शिवाजी महाराज पुतळा-सुभाष चौक-डॉ आंबेडकर पुतळा ते देशभक्त नामदेवराव जगताप क्रिडा संकूल (जिन मैदान) येथे नेत्रदिपक रिंगण सोहळा संपन्न झाला. दिंडी प्रवास करताना चिमुकल्या वारकऱ्यांचे शहरवासियांनी उत्साहाने स्वागत केले. दिंडी प्रवासात व रिंगण सोहळ्यात फुगडी, लेझीम, अभंग गौळण गायन, ढोल-ताशा व इतर पारंपारीक वाद्ये वादन, घोडेस्वारी याचा सर्वांनी पावसात भिजत आनंद घेतला. या उपक्रमाच्या आयोजनामुळे शहरासह तालुक्यात युवानेते शंभूराजे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group