Thursday, April 17, 2025
Latest:
Uncategorized

*प्रा.रामदास झोळ सरांचे कार्य प्रेरणादायी युवा पिढीने आदर्श घेऊन जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी – पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबेसारख्या एका छोट्याशा खेड्यातून भिगवणसारख्या गावामध्ये जाऊन शैक्षणिक संकुलन उभे करून शिक्षणाची गंगा सगळीकडे पोहोचवणारे रामदास झोळ सर यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श घेऊन युवा पिढीने आपल्या जीवनात वाटचाल करावी, असे मत करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केले. प्रा. रामदास झोळ फाउंडेशन व दत्तकला शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित जॉब फेअर 2022 नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते .पुढे बोलताना ते म्हणाले की,जन्मभूमी कितीही श्रेष्ठ असली तरी कर्मभूमी वेगळी असते आजच्या तरुण पिढीने गाव सोडून आत्मनिर्भर होण्यासाठी बाहेर पडणे हे काळाच्या गरज असून जिथे जिथे पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपले गाव सोडून आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करून आपल्या गावाचे व आई-वडिलांचे नाव मोठे करण्याचे काम करावे.
संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ म्हणाल्या की,करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्याना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन दिशा दाखविण्याचे काम होईल व मुले ही प्रगती पथावर जातील व यामुळे विद्यार्थ्याना रोजगाराची मोठी संधी निर्माण करून देण्याचे काम या माध्यमातून केले आहे.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा.रामदास झोळ म्हणाले की,तरुणांनी स्वतःचे गाव सोडून शहरात जाऊन नोकरी करण्यास प्राधान्य दिले, तर स्वतःचे व्यक्तिमत्व तयार होऊन अनुभवातून एक सक्षम व्यक्ती तयार होतो. त्यामुळे जीवनात प्रगती करायची असेल तर गावाबाहेर जाऊन नोकरी करण्याचे धाडस केले पाहिजे व करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून तालुक्यात पहिले व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चालू करण्याचा मानस आहे,असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ,संस्थेच्या सचिव सौ मायाताई झोळ,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, दिनेश मडके, जयंत दळवी,कंपनीचे जनरल मॅनेजर नितीन कुलकर्णी ,श्री संजय भापकर,अनुष्का तिवारी उपस्थित होते .करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे नोकरी महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये 23 कंपन्या सहभागी झाल्या होत्या.त्यामध्ये 468 उमेदवारांची मुलाखत घेऊन 235 उमेदवारांची थेट निवड करण्यात आली आहे.करमाळा तालुक्यात या नोकरी महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला असुन करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रा.रामदास झोळसर व सौ.मायाताई झोळ यांचा सपत्निक सत्कार अध्यक्ष महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. करमाळा तालुक्याचे सुपुत्र रामदास झोळ सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.रमेश रासकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगिता खाडे मॅडम यांनी केले तर आभार प्रा.हरीश अवचट सर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group