शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी निवास उगले यांची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे मागणी.

केतुर प्रतिनिधी सचिन खराडे सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असताना शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे . अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला माल कवडीमोल किमतीने विकून मोठा आर्थिक तोटा सहन केलेला आहे. या सर्व गोष्टीचा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपासाठी राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेकडे यासंदर्भात अधिक लक्ष देण्याची विनंती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष निवास उगले यांनी मागणी अर्जाद्वारे केली आहे.
