Thursday, April 17, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, व्यापारी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करमाळा येथील ‘ हमाल भवन ‘ येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते सुनील सावंत, नगरसेवक गोविंद किरवे, मनोज राखुंडे, दिपक सुपेकर, संचालक मनोज गोडसे, विठ्ठल रासकर, वालचंद रोडगे, मयूर देवी, विकी शेठ मंडलेचा, भोजराज सुरवसे, बाबा घोडके, फारूक जमादार, खलील मुलाणी आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर करमाळा शहरातून सनई वाजंत्री द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप आदी महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी लहान चिमुकली कु. जान्हवी राहुल सावंत हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी , राखणदार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. मिरवणुकीनंतर हमाल भवन या ठिकाणी करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने विकी शेठ मंडलेचा हे सामाजिक बांधिलकी नेहमी जपणारे व त्यांचे नेहमी हमालांना सहकार्य लाभते यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बाळासाहेब आतकरे या हमालाने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलाला शिकवले. त्यांचा स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्यामुळे बाळासाहेब आतकरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रदीप लुणिया, दत्तात्रय अडसूळ, चेअरमन शहाजी शिंगटे, चेअरमन दत्तात्रय नलवडे, राहुल सोरटे, अतुल शिंदे, बापू बेंद्रे, विठ्ठल इवरे उपस्थित होते. यावेळी शिवजयंती निमित्त अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी, विलास जाधव,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, दिनकर चव्हाण, प्रमोद गायकवाड , दिलीप गायकवाड, अनिल रासकर ,चतुर्भुज घाडगे, किशोर ताकतोडे, विठ्ठल गायकवाड, शकील शेख, सचिन चांदगुडे ,सतीश खंडागळे, राजेंद्र कांबळे, मोहम्मद पठाण, संजय गायकवाड, पप्पू रोडगे, शरद यादव, घोडेगावकर, सुभाष शेंडगे, हरिभाऊ मोहिते यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group