करमाळयात माही डेकोरेशनच्या माध्यमातून शिवजयंतीला मंगेश गोडसेंची फुलाची छोटे खाणी किल्ल्याची प्रतिकृती
करमाळा प्रतिनिधी शिवजयंतीला करमाळा शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याला फुलांच्या किल्ल्याचे रूप प्राप्त झाले. ही छोटेखानी फुलांच्या किल्ल्याची प्रतिकृती तयार होण्यामागे बऱ्याच जणांचे योगदान असल्याचे नाही डेकोरेशनचे डेकोरेशनचे मंगेश गोडसे यांनी सांगितले सुरुवातीला ही कल्पना सुचल्यानंतर व प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर जस जसे काम पुढं सरकत गेले तस तसं या कामाचा आवाका लक्षात येत गेला.
आज मागे वळून पाहिलं तर सर्व काही अशक्यप्राय वाटणारं होतं. हे काम करण्याची ऊर्जा आली कुठून? याचं उत्तर एकाच शब्दात सापडतं..”निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज”
हे काम मी एकट्याने केलेलं नाही यासाठी खूप जणांचे कष्ट आहेत. बारीक सारीक गोष्टी बारकाईने हाताळताना प्रत्येकाने अगदी मनापासून जीव ओतून काम केलं तेव्हा कुठं कल्पनेतील किल्ल्याला खऱ्या फुलांची झालर चढली.
काम पूर्णत्वाला नेण्यासाठी मार्गदर्शक सागरजी वाघमारे संकेत भोसले दादासाहेब नाळे, केतन कांबळे रामा कंरडे ओंकार राऊत गोट्या गोळे अनुराग करंडे,रोहित पवार सागर जाधव आकाश गरड सोनु जाधव समाधान गोळे सागर गोळे पियुष सावंत शुभम चादंगुडे असो महाराष्ट्राच्या मातीत एक अदृश्य शक्ती सर्वांना प्रेरणा देत राहते ती म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज..”
Mahi Decorators karmala
