Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

करमाळ्याची विधानसभा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार जिल्ह्यात पाच जागा धनुष्यबाणावर लढवणार – शिवसेना सचिव किरण साळी


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असून करमाळा विधानसभा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार हा मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी थांब भूमिका युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी मांडली,
लाडकी बहीण स्नेह मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील पाच जागा धनुष्यबाणावर लढवणार अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे महायुतीत अजून नवीनच वाद होण्याची चर्चा सुरू झाली आहे या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे डॉक्टर श्रद्धा जंवजाळ तालुका संपर्कप्रमुख रवी आमले जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याला जवळपास २००० म हिलांनी उपस्थिती लावली होती यातील बांधकाम नोंदणीकृत ५६७ महिलांना प्रत्येकी दहा हजार आठशे रुपयांचे ६५ लाख रुपयांची भांडी वितरण करण्यात आले यावेळी बोलताना किरण साळी म्हणाले की १९९५ पासून शिवसेना ही जागा धनुष्यबाणावर लढवत आहे अनेकजण आले आणि गेले पण पक्ष जागेवर आहे शिवसेनेला मानणारा मोठा मतदार या ठिकाणी असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली सक्षम पक्ष बांधणी झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिला मतदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करणार आहेत त्यामुळे करमाळा मतदार संघातील शिवसेनेचा विजय निश्चित आहे. सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी सात जागा शिवसेना लढवत होती व चार ते पाच आमदार शिवसेनेची निवडून यायचे हे पुनरुगत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना शहर मध्य माढा करमाळा सांगोला मोहोळ या पाच जागेवर कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असून शिवसेना बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी कामाला लागले असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख राहुल कानगुडे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुकाप्रमुखनवनाथ गुंड ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख सुरेश करचे शहर प्रमुख माधव सूर्यवंशी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group