Saturday, April 26, 2025
Latest:
Uncategorizedकरमाळा

महात्मा गांधी विद्यालयात दिनांक ८ मार्च २०२५ रोजी ‘जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी महात्मा गांधी विद्यालयात दिनांक ८ मार्च २०२५ रोजी ‘जागतिक महिला दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . हा कार्यक्रम प्रशालेत दुपारी १२ वाजता पार पडला . या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप हे उपस्थित होते . श्री .शंभूराजे जगताप यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले . आपल्या मनोगतात बोलताना ते म्हणाले ‘ स्री ही आद्य शक्ती आहे , स्री चे रूप हे देवीचे रूप आहे .तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो . त्यांनी महिलांविषयी आदर सन्मान व्यक्त केला . पुढे बोलताना त्यांनी स्री मुळेच आपल्याला समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज , महात्मा ज्योतिराव फुले ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,महाराणा प्रताप असे समाज सुधारक व वीर पुरुष मिळाले अशा भावना व्यक्त केल्या . या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . विनोद कोरडे सर यांनी केले तर विद्यार्थिनी प्रतिनिधी कु .कार्तिकी काळे हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group