आदिनाथ सहकारी कारखाना निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक १३ मार्च रोजी 30 उमेदवारांचे अर्ज दाखल
करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ कारखाना निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक १३ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून चौथ्या दिवशी दिवसापर्यंत एकूण १०० अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी बागल गट, नारायण पाटील गट संजयमामा शिंदे गट, प्रा. रामदास झोळसर परिवार जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
यामध्ये ऊस उत्पादक जेऊर गटातून धुळाभाऊ कोकरे, बाजीराव मार्कंड प्रवीण भोसले रवींद्र गोडगे भारती भोसले, सालचे गटातून देवराव सरडे, नवनाथ जगदाळे, पोमलवाडी गटातून उदयसिंह पाटील किरण कवडे ,दत्ता गायकवाड दादा कोकरे , दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळसर, रमेश कांबळे ,दशरथ कांबळे, पांडू वाघमारे दशरथ कांबळे केम गटातून रामदास शिंदे रंगनाथ शिंदे शंकर जाधव ,महावीर तळेकर अच्युत तळेकर ,महेंद्र पाटील दत्ता देशमुख सोमनाथ रोकडे दुबर हरिदास, रावगाव गटातून कल्याण पाटील दादासाहेब कोकरे ,रामचंद्र खाडे ,संदीप मारकड यांनी आतापर्यंत ३०जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित विक्री झालेल्या ७० उमेदवारी अर्ज पैकी कितीजण उमेदवारी अर्ज दाखल करतात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार दि.१७/०३/२५ असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी अमोल भोसल हे य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात असुन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पाताई ठोकडे काम पाहत आहेत.
