शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घेण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा चे निवेदन.

करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारने ५ जून रोजी जे तीन अध्यादेश काढलेले आहेत ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून ते शेतकरी विरोधी आहेत.हे अध्यादेश ताबडतोब मागे घेण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाने संपुर्ण देशभर आंदोलन सुरु केले आहे,त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुका अध्यक्ष मधुकर मिसाळ-पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस बोलताना मिसाळ-पाटील म्हणाले कि,मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा म्हणून हे अध्यादेश काढून केंद्र सरकारने बळीराजावर अन्याय केला आहे.जोपर्यंत हे शेतकरीविरोधी अध्यादेश मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळेस भारत मुक्ती मोर्चा चे कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण,डेबूजी युथ ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे,भारतीय विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,महेंद्र जगदाळे,दिपक कांबळे,जितेश कांबळे सर,प्रशांत भोसले,दत्तात्रय गाडे,रितेश कांबळे,राहुल आहेर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
