Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांना सक्रीय करण्याची करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांची मागणी

करमाळा प्रतिनिधी.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी चांगले काम केले असून त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष अधिक मजबूत झाला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक थेट आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्याशी संपर्क करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सक्षमतेने कार्यरत असल्याचे पहायला मिळत होते .त्यामुळे सध्या शिवसेनेतील आलेली मरगळ दूर करण्यासाठी शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना पुन्हा पक्ष वाढीसाठी अधिक सक्रिय होण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सोलापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे व करमाळा शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.करमाळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना तिकीट न देता पक्षाने रश्मीदिदी बागल यांना शिवसेनेचे विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे शिवसेनेत ऐन विधानसभा निवडणुकीत दोन गट निर्माण झाले त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला आता जुन्या व नव्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन दोन्ही गटातील शिवसेना कार्यकर्ते यांना आपसातील मतभेद बाजूला ठेवून शिवसेना हाच माझा गट व पक्ष या माध्यमातून एकत्र आणून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती , महानगरपालिका नगरपालिका, या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आमदार तानाजीराव सावंत यांना जिल्हासंपर्कप्रमुखपदी सक्रिय करावे अशी करमाळा शहर तालुक्यातील शिवसेना, युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group