Uncategorizedकरमाळासोलापूर जिल्हा

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सोलापूर जिल्ह्यात करमाळा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरीषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जिल्हयात प्रथम : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधे ‘ क ‘ वर्ग नगरपरीषदांमधे सोलापूर जिल्ह्यातुन करमाळा नगरपरीषदेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल नगराध्यक्ष वैभव जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार व सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी , सफाई कर्मचारी व विशेष करून सर्व करमाळा शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या योगदानामुळे नगरपरीषद हे यश प्राप्त करू शकली असे गौरवोद्गगार जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काढले . स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत करमाळा शहराचा जिल्ह्यात ‘क ‘वर्ग शहरात प्रथम,राज्यात 22 वा,पश्चिम भारतात वेस्ट झोनमध्ये 29 वा क्रमांक आला आहे . या यशाबद्दल नगरपरीषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group