करमाळा तालुक्यातील देवळाली येथे बिबट्यासदृश्य प्राणी दिसला परिसरात भीतीचे वातावरण
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील देवळाली येथे बिबट्यासदृश्य प्राणी दिसला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (ता. ७) रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेशकर व शेख वस्ती दरम्यान बिबट्यासदृश्य प्राणी दिसला. त्याने एका शेळीवर हल्ला केला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्राण्याने शेख यांच्या वस्तीवरील एक शेळी फस्त केली आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकांनी रात्री शेतामध्ये किंवा घराबाहेर फिरू नये बाहेर गेल्यास काळजी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान या भागाची उद्या सकाळी वनविभागाकडुन पाहणी केली जाणार आहे
