करमाळा तालुक्यातील पांडे गणामधून पंचायत समिती साठी सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचे नाव चर्चेत
*करमाळा प्रतिनिधी
सौ लक्ष्मी संजय सरवदे ह्या घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व भावी सरपंच असून श्री काशिनाथ वायकुळे यांच्या त्या कन्या आहेत माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या त्या कट्टर समर्थक आहेत आत्ताच त्यांचे पती श्री संजय सरवदे यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पांडे गणामध्ये त्यांचा नातेगोते व सर्वांशी सलोख्याचे नाते आहे त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य केले असून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत डोळे तपासणी शिबिर कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी मास्क वाटप केले शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करणे वयोवृद्धांसाठी मेडिकल चेकअप चे कॅम्प कोरोना काळामध्ये देखील गोरगरिबांसाठी सदैव मदत असे अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले आहेत महिला पंचायत समिती सदस्य म्हणून महिलांचे अनेक कामे त्यांच्या अडीअडचणी दूर होतील या हेतूने महिलांचे पाठबळ मिळत आहे त्यामुळे पांडे गणातून त्यांच्या नावाला अनेक महिला भगिनींमधून उमेदवारीला पसंती मिळत आहे.
