किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष काळे यांच्यासोबत करमाळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा*
करमाळा प्रतिनिधी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री वासुदेव (नाना) काळे यांची त्यांच्या निवासस्थानी करमाळा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट घेऊन कृषी, सामाजिक व राजकिय विषयावर चर्चा केली असल्याची माहिती भाजपा चे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी दिली.एकरकमी एफआरपी, शेतकरी कायदा, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या अडचणी, सूक्ष्म सिंचन योजनेतील त्रुटी, विविध शेतकरी योजना या विषयांवर प्रामुख्याने अत्यंत विस्तृतपणे चर्चा झाली. चर्चे दरम्यानच्या सर्वच विषयांवर सहकार्य करण्याचे आश्वासन श्री काळे यांनी दिले.अध्यक्ष श्री.काळे यांचे करमाळा तालुका भाजपा च्या वतीने ऊसाच्या एकरकमी एफआरपी मिळण्या संदर्भात केलेल्या यशस्वी प्रयत्ना बद्दल अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, जिल्हा सचिव अमोल पवार, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, शिवाजी केकान उपस्थित होते.
