Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसकारात्मक

करमाळा शहरात डेंग्यू चिकनगुणियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या पुढाकाराने जंतुनाशक औषधाची फवारणी

करमाळा प्रतिनिधी  करमाळा नगरपरिषदेकडून शहरात डास प्रतिबंधक औषधे व जंतूनाशकांची फवारणी .स्वतः नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी उभा राहुन जातीने लक्ष देऊन फवारणी करून घेतली . पावसाळ्या मधिल सततचा पाऊस अन् हवामानातील बदल यामूळे डासांचा फैलाव होतो व डासांचे वाढते प्रमाण डेंग्यू सारख्या आजारांना निमंत्रण देते व नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात म्हणून करमाळा नगर परिषदेने वेळीच उपाययोजना करत नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या सूचनेनुसार शहरामधील सर्वच प्रभागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची व जंतूनाशकांची धूराडा व फॉगिंग मशिनद्वारे व फवारणी पंपाद्वारे फवारणी केली जाणार आहे. आज शहरातील मेनरोड , सुभाष चौक, संगम चौक , जयमहाराष्ट्र चौक, फुल सौंदर चौक आदी परिसरात ही फवारणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी , अयुब कुरेशी, अस्लम वस्ताद कुरेशी, राजू कुरेशी , ख्वाजा कुरेशी, पप्पू ओहोळ , अभिषेक आव्हाड , बाळासाहेब कांबळे, लाला घोडके , अलीम बागवान, सचिन अब्दुले सर , आदि सह नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .उर्वरीत भागातही ही फवारणी केली जाणार आहे. त्यामूळे डासांचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होईल. शहरातील नागरिकांनीही स्वच्छता राखावी असे नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात आले आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group