स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 जिल्हास्तरीय मानांकनात करमाळा तालुक्यातील जि प प्रा शाळा नीळवस्ती यांना प्रदान
करमाळा प्रतिनिधी स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 जिल्हास्तरीय मानांकन जि प प्रा शाळा नीळवस्ती ता करमाळा जि सोलापूर शाळेला प्राप्त झाले आहे त्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब जाधव सर, आदर्श शिक्षक श्री मनोज दराडे सर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब व शिक्षणाधिकारी डॉ श्री किरण लोहार साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे पंचायत समिती करमाळा चे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब, विस्तार अधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब , केंद्रप्रमुख श्री दामाजी श्रीरामे साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
