श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा यांच्या वतीने प्रा.गणेश करे-पाटील यांना दिव्यांग साथी हा विशेष सन्मान पुरस्कार प्रदान.
करमाळा प्रतिनिधी
आमची साथ…अपंगत्वावर मात हे ब्रीद वाक्य घेऊन श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा ही संस्था दिव्यांग बालकांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.या ‘संस्थेच्या ३३ वा वर्धापन दिन” निमित्त यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांना दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल दिव्यांग साथी या विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संस्थेचे सचिव मा. श्री. चित्रसेन पाथरूट सरांच्या शुभहस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. नागनाथ पाथरूट , श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे, श्री नागनाथ मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री हिरालाल नाळे, करुणा मतिमंद शाळा मंगळवेढा शाळेचे मुख्याध्यापक श्री रामचंद्र हेंबडे, श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभुळगाव शाळेचे मुख्याध्यापक मधुकर भोसले व मूकबधिर मुलांची निवासी शाळा मंगळवेढा शाळेचे मुख्या ध्यापक मेघशाम सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
