गुरु गणेश गोपालन संस्था यांच्यावतीने गुरू गणेश मिश्री ध्यान केंद्राचे उद्घघाटन गुरु महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा . तपस्वी प.पु. अक्षर मुनीजी म. सा. , प. पु. सेवाभावी मधुर मुनीजी म. सा. यांच्या सानिध्यात गुरु गणेश मिश्री ध्यान केंद्र , सदगुरु साधना भवन कक्ष 1 व कक्ष 2 याचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस गुरु महाराजांनी गो सेवेचे व दानाचे महत्व आपल्या प्रवचनातून सांगितले. या कार्यक्रमात उदघाटणाचा लाभ किशोरजी छाजेड-परिवार सोरापूर ( कर्नाटक ) तसेच विकी विजयजी मंडलेचा -परिवार (करमाळा ), संजयजी मनोज जी दिपकजी कोठारी -परिवार यांनी घेतला असून त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .यावेळी अर्हम गो -जल यासाठी सहकार्य केल्याबद्दल अनिलजी धारीवाल (कर्नाटक ) यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गो -कक्ष या साठी सौं. पुष्पाबाई ताराचंदजी दुगगड (चेन्नई ), श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रवक संघ राजाजी नगर (बेंगलोर ),श्री श्वेताम्बर जैन देहरासर ट्रस्ट करमाळा, सौं .रतनी बाई गौतमराजजी मेहता (बेंगलोर ) यांनी सहकार्य केले .श्रेणिक खाटेर व सौं संगीता खाटेर (नगरसेविका ) या परिवाराने गो -पालन संस्थेत भूमिदान दिल्याबद्दल त्यांच्या परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास करमाळा शहरातील संपूर्ण जैन समाजाचे सहकार्य लाभले .यावेळी सुमारे दीड ते दोन हजार भाविकांची उपस्थिती होती .कार्यक्रमासाठी बेंगलोर ,हैद्राबाद, चेन्नई ,म्हेसूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, मुरुड ,अहमदपूर ,पुणे ,घोडनदी, कोल्हार ,राहुरी ,सोलापूर, .जेऊर ,राशीन ,कर्जत ,भिगवण ,बार्शी ,कुर्डुवाडी,जामखेड अशा अनेक ठिकाणाहून भाविक आले होते. या कार्यक्रमात माजी आमदार जयवंतरावजी जगताप ,नगरसेवक पप्पूजी सावंत ,सामाजिक कार्यकर्ते ज्योतीराम लावंड यांनी सदिच्छा भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांचेसह जैन श्रावक संघांचे अध्यक्ष रमेश कटारिया, राहुल संचेती, सतीश बलदोटा, जितेंद्र लालचंद लुनिया ,चंद्रकांत जी कटारिया, सुभाष काका बलदोटा, लुनावत वकील ,जगदीश शिगची, आशिष बोरा ,दिनेश मुथा, विजय मंडलेचा ,अनिल सोळंकी, जीवन संचेती ,अक्षय मांडलेचा,प्रकाश मुनोत ,रसिक मुथा ,सुचेत शियाळ ,वैभव दोशी, केतन संचेती, दीपक सोळंकी ,ऋषभ दुगगड ,कचरूकाका मंडलेचा, हर्षद लुनिया ,आदेश ललवाणी, गणेश बोरा ,प्रदीप लुनिया यांचेसह गो -सेवा समितीचे सर्व सदस्य तसेच महिला गो -सेवा समितीच्या संगीता खाटेर, सरिता सोळंकी ,उषाबाई बलदोटा, पुष्पा लुंकड ,विजया मुनोत ,शारदा कटारिया, ज्योती मंडलेचा, लक्ष्मी कटारिया ,स्वप्नाली शियाळ , सुवर्णा बलदोटा यांचेसह महिला समितीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
