करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी श्री कमलादेवी एल पी जी गॅस पंपाचा चार मार्चला भव्य शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात प्रथमच तीनचाकी चारचाकी गाड्यांसाठी श्री कमलादेवी आॕटो एल पी जी डीस्पेनसिंग स्टेशन गॅस पंपाचा शुभारंभ येत्या चार मार्च रोजी हाॅटेल राजयोगशेजारी बायपास रोड करमाळा येथे सुरू होणार आहे. सध्या पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहनधारक नागरिकांना एलपीजी गॅस हा एकमेव पर्याय इंधन म्हणून असून करमाळा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन करमाळा तालुक्यात प्रथमच एलपीजी गॅस सुरु करण्यात येणार असुन तीनचाकी फोरव्हिलर गाड्यांना एलपीजी कनेक्शन किट बसवण्याची सोय कंपनीच्या वतीने योग्य व माफक दरात करण्यात आली असून कंपनी तर्फे वेगवेगळ्या सवलतीमध्ये किट मिळतील याचा नागरिकांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त तिनचाकी चारचाकी पेट्रोल वाहनधारकांनी एलपीजी कनेक्शन बसवून घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन गो गॅस कंपनीचे मॅनेजर अभयकुमार पाटील यांनी केले आहे.