श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य माणुसकी जपणारे* *जिल्हा क्षयरोग अधिकारी मिनाक्षी बनसोडे
करमाळा प्रतिनिधी – श्रीराम प्रतिष्ठानची अन्नपूर्णा या नावाने चालवली जाणारी निराधारांसाठी दोन वेळच्या जेवणाची योजना ही अतिशय उल्लेखनीय तर आहेच पण श्रीराम प्रतिष्ठान करीत असणारे हे कार्य माणुसकी जपणारे आहे असे प्रशंशोद्गार सोलापूर जिल्हा क्षयरोग अधिकारी बनसोडे मॅडम यांनी काढले…
जागतिक आरोग्य दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील 74 क्षय रोग पिडीतांना श्रीराम प्रतिष्ठानने दत्तक घेतले. त्याप्रसंगी त्यांनी करमाळा येथे येऊन प्रतिष्ठानच्या कार्याची पाहणी केली आणि या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश चिवटे म्हणाले की तालुक्यातून क्षयरोग हद्दपार करणे ही प्रतिष्ठानची पर्यायाने आमची सुद्धा सामाजिक बांधिलकी आहे. म्हणूनच या 74 पीडित व्यक्तींना दरमहा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरडा शिधा दिला जाणार आहे.
या कार्याचा शुभारंभ जिल्हा क्षयरोग अधिकारी मीनाक्षी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य श्री भीष्माचार्य चांदणे सर यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून दिली. त्यावेळेस बोलताना ते म्हणाले की प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश चिवटे हे अतिशय तरल सामाजिक जाणीवा असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत असे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत..
याप्रसंगी मा. विलास आबा जाधव महाराज यांनी आपल्या मनोगतात या योजनेची गरज याबाबत अतिशय मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की अशा चांगल्या कार्याची फळे आपल्याला नक्कीच चांगल्या स्वरूपात मिळतील. त्यामुळेच जसे जमेल तसे प्रत्येकाने अशा चांगल्या कामाचा भाग होऊन जगावे….
याप्रसंगी
श्री.राम प्रतिष्ठान,करमाळा या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील क्षयरूग्णांना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत निश्चय मित्र या योजनेतंर्गत पोषण आहार किट वितरित करण्यात आले, यावेळी मा.डॉ.मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी
,मा.डॉ.श्रीकांत कुलकर्णी निवासी वैद्यकिय अधिकारी,मा.डॉ.गजानन गुंजकर वैद्यकिय अधिक्षक
करमाळा,मा.डॉ.बंडगर वैद्यकिय अधिकारी,करमाळा श्री.राजकिरण भुताळे जिल्हा पी.पी.एम.समन्वयक,श्री.महम्मद यूसूफ चौधरी वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक,श्री.नानासाहेब चव्हाण वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, श्री.नागराज यलसंगे वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक,श्री.गजानन विभुते वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक,श्री.कपिल भालेराव समुपदेशक ART व क्षयरूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, जयंत काळे पाटील,शरद कोकीळ, संजय किरवे, विनोद इंदलकर आदिजन उपस्थित होते.
