आपल्या सुनेचा कारभार पाहण्यासाठी सासूबाई ग्रामपंचायतमध्ये
घारगाव प्रतिनिधी आपली सून घारगावची सरपंच झाली आणि गाव गाडा कशी चालवते हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर सासू देखील भावूक होऊन खुर्चीवर बसल्या यापेक्षा मोठा आनंद कुठलाही नाही. आणि यावेळी सासूने आपल्या सुनेला (सरपंच) सांगितले की, चांगले काम कर, सर्वांना सहकार्याची भूमिका ठेव, आणि गावाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न कर, आणि गावासाठी पाणी लाईट रस्ता याकडे लक्ष दे, गाव गाडा व्यवस्थित चालव. खरोखरच आम्हाला देखील आमच्या आईचा अभिमान वाटला की एक मोलाचा आणि चांगला असा सल्ला आम्हाला दिला आणि गावाबद्दल कळवळा या माऊली कडून मिळाला त्याबद्दल त्यांचे मी सरपंच या नात्याने मनस्वी आभार मानते तसेच सोबत आमच्या सहकारी माजी सरपंच लोचना काकू पाटील यादेखील उपस्थित होत्या.
