गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा 13 ते 14 एप्रिल रोजी मोठया जल्लोषात संप्पन होणार – राजुकाका शियाळ
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानची यात्रा दिनांक १३ ते १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यात्रा कालावधीमध्ये सर्व भाविक भक्तांनी यात्रेत उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्यावतीने राजूकाका शियाळ यांनी केले आहे.गुळसडी येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथ यात्रा दिनांक 13 एप्रिल रोजी सुरू होणार असून पहाटे चार वाजता देवाचा विवाह सकाळी आठ वाजता अभिषेक सकाळी दहा वाजता सहवाद्य कावड मिरवणूक संध्याकाळी साडेआठ वाजता शेरनी छबीना साडेअकरा वाजता निघणार आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता काळभैरवनाथ आरती महाप्रसादाचा कार्यक्रम संप्पन होणार आहे. दुपारी तीन वाजता कुस्त्याचा जंगी आखाडा आयोजित केला आहे तरी गुळसडी पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्त करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सदर यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन काळ भैरवनाथ यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ गुळसडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.