Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाजलविषयक

कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी मांगी तलावात सोडावे-दिग्विजय बागल

*करमाळा प्रतिनिधी कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी प्रत्येक वेळी तालुक्याला कमी प्रमाणात मिळते. या पाण्याचा फायदा त्यामानाने खूप कमी प्रमाणात आपल्याला होतो. त्यामुळे यंदा वरील लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे, लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी मांगी तलावात सोडले तर त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मांगी तलावाची क्षमता मोठी आहे. या तलावामुळे परिसरातील सर्वच गावांना यांचा फायदा होत असतो. कुकडीवरील धरणांची टक्केवारी पाहता वरील सर्वच धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. वर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वरुन येणारे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुका सह मांगी तलावात सोडवण्यात यावे अशी आपली प्रमुख मागणी असल्याचे बागल यांनी सांगितले*

*कुकडी लाभक्षेत्र मध्ये येणाऱ्या सर्व धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. उजनी, सिना कोळगाव धरणाची वाटचाल शंभर टक्के कडे आहे. मांगी तलाव अद्याप ३५ टक्क्यांवरच आहे. मांगी तलाव परिसरात जवळपास २१०० हक्टेर ऊस आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत एक आवर्तन सोडून मांगी तलाव भरणे गरजेचे आहे. आपल्याच तालुक्यामध्ये अजून ही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांची पिके आताशी हाताशी येत आहेत. यामुळे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. गेल्यावेळी चांगला पाऊस होता म्हणून शेतकऱ्यांनी कुकडी कॅनाल परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. जर ओव्हर फ्लोचे पाणी तालुक्यासह मांगी तलावात आले तर याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दिग्विजय बागल, चेअरमन, श्री मकाई सहकारी साखर कारखाना*

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group