नव्या कृषी कायदा विरोधातील भारत बंद ला करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाचा पाठींबा
करमाळा प्रतिनिधी
भाजप सरकारने केंद्रात गेल्या वर्षी तीन नवे कृषी कायदे संसदेत संमत केल्यावर भारत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी मान्यता दिली या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली भारत बंद पुकारण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठांच्याआदेशाने करमाळा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या बंद ला पाठींबा दिला आहे
यावेळी करमाळा तहसीलदार यांचे वतीने राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अकरा महिने पासून शेतकरी आदोंलन करत असुन या शेतकरी कडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे किमान शेतकरी ना त्यांचा हमी भाव द्यावा तशी कायदयात तरतुद करावी नवा कृषी कायदा रद्द करण्यात यावा कामगारांना बेरोजगार करणारे कायदे रद्द करावे गॅस डिझेल पेट्रोल ची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी आदी मागणी काँग्रेस आय पक्षाचे वतीने करण्यात आले आहे
या निवेदनावर काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत काँग्रेस आय पक्षाचे हरिभाऊ मंगवडे. फारूक जमादार.ओ.बी.सी.सेल चे अध्यक्ष चंद्रकात मुसळे सेवादल चे अध्यक्ष हाजी फारूक बेग.हर्षवर्धन पाटील. निवास उगले रविद्र सुरवसे. साजीद बेग. नागेश उबाळे आलीम खान. सागर सामसे. पप्पु रंधवे अकबर बेग. सद्दाम शेख. संभाजी गायकवाड राजेंद्र वीर सचिन सामसे फिरोज निजाम पठाण आदी जणांच्यासहया आहेत निवेदनाच्या प्रती पोलिस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले
