स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक – संतोष कुलकर्णी
करमाळा प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. त्यांना पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि अशी शिक्षा झालेले हे एकमेव स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी होते. त्यांनी अनंत यातना आणि दुःख भोगले असे मत अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तेस्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्तहॅपी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकादमी मुंबई आणि अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले प्रतिमापूजन भावना गांथी यांच्या हस्ते करण्यात आले.हॅप्पी माईंडचे फिटनेस कोच महेश वैद्य .करमाळा उपाध्यक्ष श्री रविंद्र विद्वत. कार्यवाहक श्री निलेश गंधे दिपक कडु ,शंकर कुलकर्णी. रा.स.प.जिल्ह्य़ा सरचिटणीस अंगद देवकाते ,राष्ट्रवाादी काँग्रेस चे सचिन नलवडे ,आनंद विद्वत ,श्रध्दा गांधी आदी उपस्थित होतेत्यांंनी आपल्या जीवनामध्ये खूप काही त्याग केला स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःचे प्राण देखील वाहून देईल अशी प्रतिज्ञा केली आणि शेवटपर्यंत ते या लढ्यात सामील राहिलेत.पुण्यामध्ये शिकत असताना त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली.सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकूर यांनी केले.
