करमाळा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन योजनेतून निधी मिळणार… आ. संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
जलजीवन मिशन योजने अंतर्गत करमाळा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याचा मार्ग सुलभ झाला असून 5 ग्रामपंचायतींना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तांत्रिक मंजुरीचे आदेश जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिलेले आहेत. प्रशासकीय मान्यतेचे आदेश मिळणे अद्याप बाकी आहे. उर्वरित 6 ग्रामपंचायतींना सुधारित इस्टिमेट नुसार तांत्रिक मंजुरी मिळेल अशी माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
यामध्ये निमगाव ह 1 कोटी 15 लाख 27 हजार 473 रुपये, घोटी 31 लाख 92 हजार 689, मसेवाडी 52 लाख 73 हजार 997, गोयेगाव 28 लाख 89 हजार 855 तर हिवरवाडीसाठी 53 लाख 41 हजार 359 रुपयाचा निधी मंजुरीचे तांत्रिक आदेश प्राप्त झाले असून एकूण 2 कोटी 82 लाख 25 हजार 373 रुपये निधी मंजुरीचे तांत्रिक आदेश मिळालेले आहेत.
उर्वरित पाथूर्डी, जेऊरवाडी ,शेटफळ, वांगी नंबर 1, वांगी नंबर 2 ,चिखलठाण या ग्रामपंचायतीचे सुधारित इस्टिमेट नुसार तांत्रिक मंजुरीचे आदेश लवकरच मिळतील अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
मतदार संघातील अधिकाधिक गावांना जलजीवन मिशन योजने अंतर्गत मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ग्रामीण भागातील पाणीप्रश्न या माध्यमातून निकाली निघेल अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
