आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतली कृषीरत्न आनंद कोठडीया यांची भेट केळी संशोधन केंद्राची मागणी मार्गी लावण्याचा दिला विश्वास.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज जेऊर येथिल सामाजिक कार्यकर्ते आनंद कोठडीया यांची सदिच्छा भेट घेऊन तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली शेलगाव ता करमाळा येथे केळी संशोधन केंद्राच्या मागणीसाठी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा व तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांना महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर झाला असून या योजनेचे शंभर टक्के काम एका वर्षभरात पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला सुरवातीला जेऊर येथिल व्यापारी अभयशेठ लुंकड यांनी प्रास्ताविक केले यावेळी कृषी रत्न आनंद कोठडीया यांचा सन्मान आमदार संजयमामा शिंदे यांनी केला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास निमगीरे,माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी ,सुजीत बागल, निळकंठ अभंग, उमेश पाथ्रुडकर किरण डोके, विजय लबडे, नानासाहेब साळूंके, बालाजी गावडे यांच्यासह लोकविकास संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
