करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांच्या प्रयत्नांना यश पांडे येथील रमेश घोरपडे या रुग्णास लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत
करमाळा प्रतिनिधी पांडे ता. करमाळा येथील रहिवाशी असलेले रमेश धर्मराज घोरपडे हे सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट असून घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्ष प्रमुख व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन समन्वयक श्री.शिवकुमार चिवटे यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदतीसाठी अर्ज केला होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे यांची शिवकुमार चिवटे यांनी पेशंटच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घालून दिली होती व
मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता तसेच
शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक रोहित वायभसे, तालुका कक्षप्रमुख दिपक पाटणे यांच्या सहकार्यातून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करमाळा तालुक्यातील पांडे गावचे रहिवासी रमेश घोरपडे यांना मिळाली आहे.त्यामुळे घोरपडे यांचे प्राण वाचले असून रमेश घोरपडे यांच्या परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे अरविंद मांडवकर सर, राहुल भालेराव सर,ॠषिकेश देशमुख सर व दिपाली चव्हाण मॅडम तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण टीम चे आभार मानले.*
