Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सरपडोह येथे मोठ्या उत्साहात बाल आनन्द बाजार संपन्न

करमाळा प्रतिनिधी
शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या मैदानात शाळा सरपडोह येथील विद्यार्थ्यां चा बाल आनंद बाजार खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाळेतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अवघ्या 2 तासात भाजीपाला विक्रीतून विद्यार्थ्यांनी सुमारे 10000 रुपयांचा व्यवहार पार पाडला. या साठी पालकांनी खूप मोठा सहभाग नोंदवला  व मुलांकडून भाजीपाला खरेदी करून प्रोत्साहन दिले.
या आनंद बाजार चे उदघाटन शाळा समितीचे अध्यक्ष श्री शरद घोगरे यांचे हस्ते झाले. या वेळी सरपंच सौ मालनताई वाळके, उपसरपंच श्री नाथराव रंदवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन चे सर्व सदस्य , पोलीस पाटील व पालक ,माता पालक उपस्थित होते.
या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री नारायण डौले व सर्व शिक्षक बंधूनी केले . बाल आनंद बाजार अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी रित्या संपन्न झाला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group