करमाळा

इंडियन सिमलेस क्रेडीट को-ऑप्रेटिव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुक खेळीमेळीत संपन्न ; सोसायटीत 13 संचालकांची निवड

.   नगर प्रतिनिधी इंडियन सिमलेस क्रेडीट को-ऑप्रेटिव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुक खेळीमेळीत संपन्न झाली. या  सोसायटीत 13 संचालकांची निवड झाली आहेे.    यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून चैतन्य शिंदे, अजित बेंद्रे, रविंद्र पाखले, राजेश सरमाने, गितेश्‍वर दळवी, राजेंद्र कदम, बापुसाहेब मोरे, सुनिल गुळवे (भोसले) रखमाजी गोरे, सतिष कावरे, अनुसुचित जातीमध्ये गणपत वाघमारे, ओ.बी.सी.मधून प्रकाश दाभाडे, भटक्याविमुक्त जातीमधून नामदेव खंडागळे, महिलांमधून बिनविरोध पालय डफळ वियजी झाले.
यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे इंडियन सिमलेस व्यवस्थापन विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इंडियन सिमलेस कंपनीचे प्लाँटहेड चैतन्य शिंदे, जालिंदर डोके, जनरल सेके्रटरी वसंत सिंग, युनियन अध्यक्ष राजु वाकळे, राजेंद्र पाटील, कचरु ढगे, जलील शेख आदी उपस्थित होते.
इंडियन सिमलेस कंपनीचे प्लाँटहेड चैतन्य शिंदे म्हणाले, इंडियन समिलेस क्रेडीट को-ऑप्रेटिव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ही चांगली सेवा देण्यासाठी होती, आणि चांगली सेवा देण्यासाठी आज अनेकजण पुढे येऊन हि निवडणूक अतिशय शांत आणि शिस्तीने लढवली. हार जित होत असते, कोणीही कुठलाही द्वेष मनात न ठवता सोसायटीसाठी एकत्रीत काम करुन कर्मचार्‍यांना फायदा होईल असे निर्णाय घ्यावे, असे सांगून विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
विजयी उमेदवार राजेश सरमाने म्हणाले की, चांगले कार्य केल्यानेच ही पावती आम्हाला आज मिळली असून या पदाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांच्या हिताचे काम सर्वांना सोबत घेवुन करणार असल्याचे सांगून आमच्यावर दाखविलेल्या विश्‍वासबद्दल सर्व मतदारांना धन्यवाद दिले.
पंचवार्षिक निवडणुक पार पाडण्यासाठी सोसायटीचे व्यवस्थापक शरद थोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
———–

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group