साडे हायस्कुलची गौरवशाली पंरपंरा गटविकास अधिकारी मनोज राऊत
करमाळा प्रतिनिधी साडे हायस्कुल साडे या प्रशालेची गौरवशाली पंरपंरा असुन ग्रामिण भागात अनेक सुविधाचा अभाव असताना शैक्षणिक क्षेत्रात कायम ठसा उमटवुन नावलोकिक प्राप्त करण्याची पंरपंरा ग्रामीण भागातील शाळासाठी आदर्शवत आहे असे गौरवद्गागार पंचायत समितीचे गटविकास मनोज राऊत यांनी व्यक्त केले साडे ता.करमाळा येथील व्यायामशाळेच्या कवायतप्रसंगी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे मेघराज उद्योग समुहाचे हनुमंत पाटील बॅंकेचे निवृत अधिकारी नारायण गावडे,उपस्थित होते तर व्यासापिठावर श्री.यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोकुळराव पाटील,सचिव देविदास ताकमोगे सर जेष्ठ संचालक डाॅ.वसंतराव पुंडे उपाध्यक्ष बाजीराव माने उद्योजक युवराज गोमे,सामाजिक कार्यकर्त दत्तात्रय रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की साडे हायस्कुल साडे हे तालुक्यातील नव्हे तर जिल्हयातील आदर्श शाळा म्हणुन गणली जात आहे.या परिसरातील गोरगरीब विद्याथ्याना उत्तम शिक्षण देण्याचे काम विद्यालयामार्फत अविरतपणे केले जात आहे.या शाळेचे विद्यार्थी राज्यभर आज वेगवेगळया मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे.या शाळेचा विद्यार्थी म्हणुन मला याचा अभिमान वाटतो.आज सगळीकडे खाजगी शाळाचे प्राबल्य वाढत असताना या शाळैने मात्र आपली गुणवत्ता आणि दर्जा कायम राखत आपला नावलौकीकाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना करसल्लागार आनंद गावडै म्हणाले की ग्रामिण व शहरी याबाबत विचार केला जातो तेव्हा ग्रामिण भागात सुविधाचा अभाव असल्याचे कारण सांगितले जाते मात्र तरीही ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा लक्षवेधी कसा असु शकतो याचे उत्तम उदाहरण साडे हायस्कुल आहे.वेगवेगळया क्षेत्रामध्ये साडे हायस्कुल आपला ठसा कायम उमटवित वाटचाल चालु असुन गावचा रहिवाशी म्हणुन अत्यंत अभिमान वाटतो यावैळी मेघराज उद्योग समुहाचे हनुंमत पाटील निवृत बॅंक अधिकारी नारायण गावडे यांची भाषणे झाली.यावेळी जिल्हा क्रिडा संचालनालयाच्यावतीने ७ लाख रुपये किमतीचे व्यायाम साहित्य यावेळी माजी विद्यार्थी नारायण गावडे,आनंद गावडे यांनी गोरगरीब हूशार विदयार्थ्याना ७५ हजार रुपयाचे सायकल शालेय साहित्याचे वाटप केले यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष गोकुळराव पाटील सचिव देविदास ताकमोगे,संचालक डाॅ.वसंतराव पुंडे,मुख्याध्यापक प्रकाश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव देविदास ताकमोगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक सचिन गाडेकर यांनी केले तर आभार प्रविण आवटे यांनी मानले.
