जातेगाव – टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार – गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी करमाळा – जातेगाव- टेंभुर्णी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर मृत्यूचा सापळा तयार झाला असून दररोज या रस्त्यावर अपघात होऊन अनेक व्यक्तींचा मृत्यू होत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा येथील कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे , तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री, के .एम .उबाळे यांना दिले आहे ,
यावर श्री,के. एम .उबाळे यांनी आम्ही लवकरात लवकर या रस्त्यावरील खडे बजवु असे आश्वासन दिले ,
