करमाळाकृषी

अतिवृष्टीमुळे बाधित फळबागांचे पंचनामे सुरू… राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे 1 नोव्हेंबर 2022 रोजीचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

करमाळा प्रतिनिधी

कृषी विभागाकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू होते .परंतू केळी ,आंबा, डाळिंब, निंबोणी, सिताफळ आदी फळबागांचे पंचनामे केले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने 31 डिसेंबर पर्यंत बाधित फळबागांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले होते. या निवेदनाची दखल घेतली असून प्रत्यक्षात बाधित फळबागांचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2022 रोजी चे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी दिली.
ज्या फळबागांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत त्या फळबागांचे पंचनामे येत्या 2 दिवसात करू .जर कोणा शेतकऱ्याचे फळबागांचे प्रत्यक्ष नुकसान होऊनही पंचनामे बाकी असतील तर त्यांनी त्या त्या गावातील तालुका कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा व आपले पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार समीर माने व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.
फळबागांचे पंचनामे करणे संदर्भात काही अडचण असेल तर त्यांनी थेट तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करावा. प्रत्यक्ष बागांची पाहणी करून नुकसान असेल त्या भागांचे पंचनामे आम्ही नक्कीच करू असा शब्द तहसीलदार सो आणि तालुका कृषी अधिकारी सो यांनी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group