करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दौड संपन्न
*
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , करमाळा व 9 महाराष्ट्र बटालियन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर , विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , करमाळा पोलीस स्टेशनचे API श्री.जगताप साहेब , API श्री.कुंजीर साहेब , API श्री. जगदाळे साहेब , महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य नागेश माने , श्री. कलिम काझी , माजी विस्तार अधिकारी श्री.अनिल बदेसाहेब , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , एन.सी.सीचे सी.टी.ओ. श्री. निलेश भुसारे व एन.सी.सीचे कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .