करमाळा नगरपरिषद अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा करमाळा यांचे संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त 28 मार्च रोजी सखी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा करमाळा यांचे संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त सखी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28 मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती माधुरी परदेशी जिल्हा महिला आघाडी प्रमुख अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना परदेशी म्हणाल्या की सदर कार्यक्रम महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे, सचिन तपसे क. न. पा. मुख्याधिकारी, माधुरी सपाटे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती करमाळा,ज्योती कडू पाटील अधिसेविका उप जिल्हा रुग्णालय करमाळा,माधुरी दिवाण स्थापत्य अभियंता ल पा करमाळा, प्रिया पाटील उपअधीक्षक भूमि अभिलेख करमाळा, गिरीजा मस्के सह पो निरीक्षक करमाळा आदी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम श्री गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ येथे दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे. सदर मेळावा हा फक्त महिलांसाठीच असून तो बंदिस्त व सुरक्षित असल्याने जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा व आपला सहभाग हा दिनांक 25 मार्च पर्यंत नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क –
सौ. स्वाती माने ७३५०२५२६७७
सौ. निलिमा पुंडे – ९८६०७३३९२२ सौ. सुलभा पाटील – ९८९०८८५८२८ सौ. मंजिरी जोशी – ९६८९६९०७१५
सौ. माधुरी परदेशी – ९७६३३२७३०६
सौ. ललिता वांगडे – ९४२०९१९१४२
सौ. निशिगंधा शेंडे- ७८४३००३७९३
सौ. सारिका पुराणिक – ९४०४३०९८८. कार्यक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या महिला व महिला ग्रुप यांनाच कार्यक्रम सादर करण्यासाठी प्राधान्याने परवानगी देण्यात येणार आहे.
