काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात ‘सत्याग्रह आंदोलन- प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर १५ ते २० एप्रिलदरम्यान ‘सत्याग्रह आंदोलन’ केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे. रविवारी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
तालुकाध्यक्ष जगताप म्हणाले, राहुल गांधी यांनी देशात काढलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातूनच भाजप सरकार अवस्थ झाले असून विरोध पक्षाचा आवाज दाबण्याचे काम सुरु केले आहे. मात्र हा प्रकार आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यांच्यावर केलेली कारवाई ही निषेधार्ह असून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे देखील या सत्याग्रह आंदोलनाला येणार आहेत. संपुर्ण जिल्ह्यातील तारखा निश्चित झाल्यानंतर १५ ते २० दरम्यान एक दिवस हे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष सुजय जगताप, ओबीसी विभागचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ नितीन चोपडे,गणेश फलफले आदी यावेळी उपस्थित होते.
