नरेंद्रसिंह ठाकुर… माझा बालपणीचा खास मित्र- ॲड अजित विघ्नै
नरेंद्रसिंह ठाकुर… माझा बालपणीचा खास मित्र…भारतीय जनता पक्षाचा करमाळातील एक निस्सीम कार्यकर्ता- युवकनेता… पत्रकार… सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन काम करणारा सेवक… संजय गांधी निराधार योजना समिती मधे अशासकीय सदस्य म्हणुन महत्वाची जबाबदारी पार पाडणारा दोस्त.. राजपुताना संघटन चा मुख्य प्रवर्तक .. आणि सच्चा साथी…
नरेंद्र हा माझ्या बालपणापासुन सोबत असलेला एक सच्चा मित्र आणि मार्गदर्शक आहे. अगदी लहानपणी केत्तुरला नरेंद्रचे वडील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकुर कार्यरत होते. या क्षेत्रात डॉक्टर जगतपालसिंह ठाकुर यांचा वेगळाच रुतबा आणि रुबाब होता. माझ्या शेजारीच नरेंद्रचे कुटुंब राहायला होते. त्यामुळे आम्ही बालपणापासुनचे मित्र..,
गोट्या, अंब्याचे कोया, विटी दांडु, सुरफाट्या, गलोर, लपाछपी, कब्बडी, खोखो , क्रिकेट , फुटबॉल, पत्ते, कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी, हा प्रत्येक खेळ आनंदाने खेळलो, बागडलो ते नरेंद्रमुळेच!…
नदीवर तासनतास पोहायला जाण्यापासुन , बाल गणपती मंडळ स्थापन करून मित्रांचे संगठन करणारा मित्र म्हणजे नरेंद्र!..
वक्तृत्व, निबंध आणि प्रत्येक स्पर्धेत मला प्रोत्साहित करणारा हा माझा मित्र मला फक्त शालेय जीवनात मार्गदर्शक राहीला असे नाही तर आजपर्यंतच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत देखिल तो माझा मार्गदर्शक राहीलेला आहे. माझ्यापेक्षा वरच्या इयत्तेत असुनही त्याची आणि माझी मैत्री पकाट होती.
अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असणाऱ्या माझ्या या मित्राने मी बारामतीत कॉलेजला असताना आणि तो माळेगावला व्हेटरनरी कोर्सला असताना मला सामाजिक आणि राजकीय विषयात मार्गदर्शन केले, प्रोत्साहित केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, गोपिनाथजी मुंडे , विलासरावजी देशमुख , शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभांना आवर्जुन उपस्थिती लावण्याचे व त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य या दोस्तामुळेच मला लाभले. तुळजाराम चतुरचंद कॉलेजला होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यापासुन ते करमाळा विधानसभेत स्व. शिवाजीराव मांगले साहेब यांच्या प्रचारात सहभाग घेण्यापर्यंत मला प्रेरणा दिली ती या माझ्या मित्रानेच.. आणि सुरु झालेला हा प्रवास आजपर्यंत चालुच आहे. गावातील ग्रामपंचायतीत सदस्य.. उपसरपंच.. सरपंच.. पंचायत समितीची निवडणुक… विविध सामाजिक कार्य… संजय गांधी निराधार योजना… तालुका विधी व भ्रष्टाचार निर्मुलन समिती आणि अनेक ठिकाणी कार्यरत राहण्यास प्रोत्साहित करताना नरेंद्र आजही कायम सोबत आहे…
पैसा कमविण्यापेक्षा माणसे कमवली पाहीजे.. हे त्याचे ब्रीद आहे….!
बालपणापासुन आम्ही एकत्र आहोत आणि आजही करमाळा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना आम्ही एकत्र आहोत.. माझे वकीलीचे कामी रोज करमाळाला जाणे येणे असतेच आणि नरेंद्र करमाळ्यात वास्तव्याला असल्यामुळे आमचा रोजचा संपर्क आजही कायम आहे याचा मला खुपच आनंद आहे. एक सच्चा मित्र आणि मार्गदर्शक म्हणुन नरेंद्र सोबत आहे.. आपली सोबत अशीच राहील… हे नक्की!
नरेंद्र तुझे मार्गदर्शन आणि साथ अशीच कायम मिळो तसेच तुला उत्तोमउत्तम आरोग्य,धन,संपदा, समाधान मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
हैप्पी बर्थडे नरेंद्र! 🎂🎂🎂🎂🎂