Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी प्रा. रामदास झोळ सर यांच्याशी चर्चा

करमाळा प्रतिनिधी भारतीय नागरिकांना शासन ज्याप्रमाणे मतदान कार्ड, पॅन कार्ड आधार कार्ड देते, त्याच प्रमाणे जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकरी राजाला “शेतकरी आधार कार्ड” उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खासदार श्री राजू शेट्टी साहेब यांच्याकडे केली आहे. दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली भिगवण येथे खासदार श्री राजू शेट्टी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाबाबत तसेच विविध प्रश्नांवर प्रा. रामदास झोळ सर व खासदार श्री राजू शेट्टी साहेब यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली ‌. दत्तकला शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. माया झोळ मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष, मा. रवींद्र गोडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, तालुका पक्ष अध्यक्ष बापू फरतडे, तालुका उपाध्यक्ष बापू वाडेकर, स्वाभिमानी शाखाध्यक्ष जातेगाव चे अशोक लवंगारे. स्वाभिमानी नेते दीपक फरतडे उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी हा जगाचा पोशिंदा अन्नदाता असूनही त्याची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे.अनेक शेतकऱ्यांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.यामुळे उत्पन्न व गरजा यांचा मेळ न बसल्याने अनेकांचे बळी गेले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्याचे जीवन सुखी संपन्न करण्यासाठी अल्पभूधारक अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सोयी, सवलती त्यांच्या पाल्याला मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. तर दुसरीकडे वर्षाला आठ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना शैक्षणिक फी ची सवलत मिळते. मात्र शेतकरी यापासून वंचित आहे, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचीअट शिथिल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर दिवस रात्र उभ्या पिकाला जगण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला वैद्यकीय सुविधेची सुद्धा गरज असते. वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने व परिस्थितीमुळे वैद्यकीय खर्च करू न शकल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्राण यामुळे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधा सरकारमार्फत देण्यात याव्यात जेणेकरून शेतकरी राजा खऱ्या अर्थाने सुखी होईल. आपण जय जवान जय किसान यांचा नारा अभिमानाने देतो आपले ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने आपण अवलंबल्यास आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल असा आशावाद प्रा. रामदास झोळ सर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे व्यक्त केला आहे. प्रा. रामदास झोळसर यांनी शेतकरी प्रश्नाविषयी व शेतकऱ्यांच्या कल्याणकारी अभ्यासपुर्ण मागण्यांचा आपण नक्कीच विचार करून संबंधित मागण्या शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन खासदार राजू शेट्टी यांनी प्राध्यापक रामदास झोळसर यांना दिले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group