करमाळा

जुनी पेंशनच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानात देशभरातून लाखोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित – श्री तात्यासाहेब जाधव, जिल्हानेते सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटना

 

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शंखनाद रॅलीसाठी उपस्थित झाले 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेंशन बंद करून शेअर मार्केट वर अवलंबून असलेली नवीन पेंशन योजना लागू केली त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे या विरोधात 2005 पासून देशातील विविध राज्यांत विविध कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे आज देशपातळीवर जुनी पेंशन मिळावी व खाजगीकरण बंद करावे यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत शंखनाद आंदोलन केले आहे येणाऱ्या काळात जर जुनी पेंशन योजना लागू केली नाही तर सर्व कर्मचारी शासनाच्या विरोधात जाणार आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शासनाच्या भावनांचा सहानुभूती पूर्वक विचार करून जुनी पेंशन योजना लागू करावी रामलीला मैदानावर करमाळा येथील करमाळा तालुका जुनी पेंशन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री अरूण चौगुले, श्री साईनाथ देवकर, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री अजित कणसे, श्री बलभीम बनसोडे, श्री प्रताप राऊत, श्री अशोक दुधे, श्री धनाजी शिंदे, श्री महेश आरडे, श्री पोपट पाटील, श्री शरद झिंजाडे, श्री सुनिल वाकडे , श्री विष्णू गिते व राज्यभरातील हजारो कर्मचारी उपस्थित होते*

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group