आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू
करमाळा प्रतिनिधी
सोमवार दि.02/10/2023 रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिनी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले.यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांचे विश्वासू विलासदादा पाटील,आशिष गायकवाड, रविंद्र वळेकर, डॉ.विकास वीर,अण्णा साळुंखे,सूरज ढेरे,अप्पा आरणे,प्रणित शिंदे, दहिगाव योजनेचे उपअभियंता एस. के.अवताडे,शिंदे साहेब,कांबळे साहेब,शेख साहेब आदी उपस्थित होते.
अत्यंत कमी प्रमाणात पाऊस असल्यामुळे चालू पिके केळी,ऊस यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.पाणी व चारा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे अशात पाणी मिळणे आवश्यक होते.आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची भावना लोक व्यक्त करू लागले आहेत.
