Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपादन भरपाई लवकरच मिळणार -गणेश चिवटे


करमाळा प्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भु संपदान भरपाई लवकरच मिळणार असलेची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक बोलताना चिवटे म्हणाले की,कुकडी डावा कालवा २४५ किमी करिता झरे व खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना भु संपदान भरपाई लवकरच मिळणार आहे.यासंदर्भात खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला आता यश आले आहे.प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांनी यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना तलाठी यांचेमार्फत नोटीसा बजावून अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत , या नोटीसा झरे व खडकेवाडी मधील संबंधित शेतकऱ्यांनी झरे (दुरगुडे वस्ती) येथे उद्या बुधवार दिनांक ३आक्टोबर रोजी सकाळी 10:00 वाजता येऊन घेऊन जाण्याचे आवाहन श्री गणेश चिवटे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group