करमाळासकारात्मक

घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा -हाजी उस्मानशेठ तांबोळी अध्यक्ष करमाळा मुस्लिम समाज

करमाळा प्रतिनिधी

भारत देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यात दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट या दरम्यान शासनाचा ” हर घर तिरंगा “हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येकांनी आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर तिरंगा झेंडा लावुन सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे. 
यावेळी बोलताना तांबोळी म्हणाले की तमाम भारत वासीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यांच्या स्मृती तेवत राहव्यात देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शहीद क्रांतीकारक व अज्ञात नायकांचे व स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे आपल्या देश भक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी आपल्या देशाप्रती भक्ती सह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी हाच हया मागचा उद्देश आहे त्या मुळे तमाम नागरिकांनी आप आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर “” हर घर झेंडा “” हा शासनाने दिलेला उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रध्वजाची उभारणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येणार आहे अश्या प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक त्याची प्रतिष्ठा राखुन तो स्पष्ट पणे दिसेल अश्या रितीने लावण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाकडून व जिल्हा प्रशासना कडुन ज्या मार्गदर्शक सूचना प्रसारित होईल त्या सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करून राष्ट्रध्वजाची उभारणी करावी असे आवाहन उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group