दहीगाव सिंचन योजेनला दिगंबराव बागल यांचे नाव द्या गणेश झोळ यांची मागणी
प्रतिनिधी वाशिंबे.
युती सरकारच्या काळात स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रयत्नाने साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणनार्या दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरवात झाली.त्यामुळे या योजनेला स्व. दिगंबरराव बागल यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बागल गटाचे पश्चिम भागातील युवकनेते गणेश झोळ यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
झोळ यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील दुष्काळ हटविण्यासाठी स्व.बागल मामांनी युती सरकारच्या काळात मंत्री पद नाकारुन माझ्या तालुक्यातील शेतकर्यांसाठी दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कडे केली होती.या योजनेचे महत्त्व जाणून तत्कालीन सरकारने या योजनेला मंजूरी देऊन निधी उपलब्ध केला. स्व.बागलमामा व शामलताई बागल यांच्या कार्यकाळात या योजनेच नव्वद टक्के काम पूर्ण झाले.त्यामुळे बागल मामांचे या योजनेस मोठे योगदान आहे.त्यामुळे या योजनेस त्यांचे नाव देने स्वागतहार्य आहे.तालुक्यातील सर्व पक्षीय नेते याचे स्वागत करतील.
कार्यवाही साठी निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
